आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण बेदींच्या भाजप प्रवेशाने केजरीवाल 'खुश', कुमार विश्वास यांनी ठरवले 'जयचंद'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील की पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असलेल्या किरण बेदींच्या भाजप प्रवेशानंतर 'आप'च्या अनेक नेत्यांनी किरण बेदींवर हल्ला चढवला आहे. पक्षाचे प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी मात्र बेदींवर टीका करणे टाळले आहे. उलट केजरीवाल यांनी बेदींना शुभेच्छा दिल्या. पण आपचे नेते कुमार विश्वास यांनी मात्र किरण बेदींची तुलना थेट धोकेबाज राज जयचंद याच्याशी केली आहे.
केजरीवाल यांनी गुरुवारी एका ट्वीटमध्ये म्हटले की, 'मी सुरुवातीपासून किरण बेदींना मानत आलो आहे. त्यांनी राजकारणात यावे यासाठी मी त्यांना अनेकदा आग्रह केला होता. त्यांनी आज त्यासंदर्भात निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. तर दुसरीकडे 'आप' नेते कुमार विश्वास यांनी किरण बेदींना 'जयचंद' ठरवले आहे. विश्वास कवितेच्या ओळी ट्वीट केल्या, 'युद्धों में कभी नहीं हारे हम डरते हैं छल-छंदों से, हर बार पराजय पायी है अपने घर के जयचंदों से" अशा आशयाच्या ओळींद्वारे विश्वास यांनी बेदी यांची तुलना राजा जयचंदबरोबर केली. क्षत्रिय राजा पृथ्वीराज चव्हाण यांना धोका दिल्याने राजा जयचंदला गद्दार आणि देशद्रोही म्हणून ओळखले जाते.
'आप' नेते सोमनाथ भारती यांनीही किरण बेदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा हा निर्णय प्रवाहाच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'आप' प्रवक्ते आतिशी मरलेना म्हणाले की, अण्णांच्या भ्रष्टचार विरोधी आंदोलनादरम्यान किरण बेदी राजकारणाच्या विरोधक होत्या. पण आता त्यांनी दृष्टीकोन बदलला असावा, असे वाटते.

दिग्विजय सिंह यांनीही साधली संधी
काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्वीटमध्ये किरण बेदी यांचे एक जुने ट्वीट पोस्ट केले आहे. हे ट्वीट पोस्ट करून त्यांनी, यू टर्न मिस किरण बेदी? की खरंच तुमचे हृदय परिवर्तन झाले आहे. माझ्या शुभेच्छा आपल्या बरोबर आहेत, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली. किरण बेदी यांनी एका ट्वीटमध्येस, मोदी यांना कोर्टाने दोषी ठरवले नसले तरी त्यांना एक ना एक दिवस दंगलींबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले, असे म्हटले होते. त्याला दिग्विजय यांनी रिट्वीट केले होते.