आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumar Vishwas Controversy New Video Shows Aap Volunteer Being Coached By Ex Congress

कुमार विश्वास यांच्यावरून महिला आयोगात फूट, जुही खान यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाच्या (आप) एका महिला कार्यकर्तासोबत कथित अनैतिक संबंधप्रकरणी पक्षाचे कुमार विश्वास अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे, कुमार विश्वास यांच्यावरून दिल्ली महिला आयोगात फूट पडली आहे. कुमार विश्वास यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचे आयोगाच्या सदस्य जुही खान यांनी म्हटले आहे. आयोगाची पत्रकार परिषद सुरु असताना जुही खान यांनी आयोगाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.

आयोगाच्या अध्यक्षा बरखा शुक्ला या कुमार विश्वास यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी उपस्थित पत्रकारांना माहिती देत होत्या. यादरम्यान, कुमार यांच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप राजकीय प्रेरित असल्याचे जुही खान यांनी म्हटले आहे. 'मी कुमार यांना ओळखते. ते असे करू शकत नाही,' असे जुही खान यांनी सांगितले. यावरून पत्रकार परिषदेत प्रचंड गोंधळ उडाला.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून महिला आयोगाने कुमार विश्वास यांना नोटीस बजावली होती. कुमार यांना आज (मंगळवारी) दुपारी महिला आयोगासमोर हजर व्हायचे होते. परंतु आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचे कारण पुढे करत कुमार अनुपस्थित राहिले.

दुसरीकडे, कुमार यांच्यावरून महिला आयोगात फूट पडल्याचे दिसून अाले आहे. जुही खान यांनी कुमार विश्वास यांची पाठराखण करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, कथित अनैतिक संबंधप्रकरणी महिला अायोगाने विश्वास यांना स्पष्टीकरण मागितले आहे. विश्वास यांना मंगळवारी दुपारी तीन वाजता आयोगाने हजर राहाण्‍यास सांगितले आहे. परंतु समन्स मिळाला नसल्याने कुमार विश्वास आयोगासमोर हजर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे, धमकी देणार्‍या महिलेचा एक व्हिडिओ कुमार विश्वास यांनी रीट्वीट केला आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीच्या सांगण्‍यावरून महिला मीडियासमोर जबाब देताना दिसत आहे.
अर्चना नामक एक यूजर्सचे ट्वीट @archi7194: Just watch ....wat d hell is this .... This girl is paid ??? ला विश्वासने रिट्वीट केले आहे.
पीडितेला मार्गदर्शन करणारा व्यक्ती कॉंग्रेसचा कार्यकर्ता?
कुमार विश्वासद्वारा 'रीट्वीट' केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीडितेला मार्गदर्शन करत असल्याचे दिसत आहे. 'आप'च्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार, महिलेचे कान भरणारा व्यक्ती नोएडा येथील युवा कॉंग्रेस युनिटचा माजी अध्यक्ष जगत अवाना आहे. मीडियासमोर ही महिला जगतच्या सांगण्यावरूनच जबाब नोंदवत होती.
काय आहे प्रकरण?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुमार विश्वास यांनी अापल्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोप करणारी महिला 'आप'ची कार्यकर्ता असून तिने कुमार विश्वास यांच्यासोबत अमेठीत प्रचार केला होता. पीडितेने याप्रकरणी 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याकडून मदत मागितली होती. महिलेल्या तक्रारीवरून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मला धमकावले जात आहे, पीडितेचा आरोप