आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पार्टीचे नेते निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. आधी निवडणूक लढविणार नसल्याचा दावा करणारे विश्वास आता थेट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी याच्याविरुद्ध अमेठी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ते 27 डिसेंबरला अमेठीचा दौरा करणार आहेत. त्यात ते सर्व शक्यता पडताळून पाहणार आहेत. अर्थात त्यांनी अद्याप दौ-याला दुजोरा दिलेला नाही. परंतु, अमेठीमध्ये राहुल गांधींना आव्हान देण्याची इच्छा असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
कुमार विश्वास यांनी मुलाखतीत राहुल गांधी यांच्यावर टीका करताना सांगितले, की मी 'निर्भया' बलात्कार प्रकरणात दिल्लीमध्ये झालेल्या निदर्शनाच्या वेळेस पोलिसांच्या लाठ्या खाल्या आहेत. अरविंद केजरीवाल ज्यावेळी उपोषण करत होते, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. जेव्हा देश 'पेन'मध्ये होता, त्यावेळी ते स्पेनमध्ये होते.
विश्वास यांच्या मुलाखतीवरुन ते अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते. तसे झाल्यास अमेठीतील राजकीय समीकरण बदलू शकते. दिर्घ कालावधीनंतर या मतदारसंघात एक रोचक सामना होऊ शकतो. अमेठी मतदारसंघावर आतापर्यंत गांधी कुटुंबियांचेच वर्चस्व राहिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.