फाइल फोटो : कविता सादर करताना कुमार विश्वास
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (
आप) नेते कुमार विश्वास रिअॅलिटी टीव्ही शो \'
बिग बॉस\' मध्ये सहभागी होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शो प्रसारीत करणा-या कलर्स वाहिनीने कुमार विश्वास यांची मागणी फेटाळली आहे. विश्वास यांनी वॉर विडोज फंड (युद्धात शहीद झालेल्यांच्या विधवांसाठीचा निधी) मध्ये 21 कोटी रुपये जमा करण्याची अट घातली होती.
विश्वास यांनी बिग बॉसची निर्मिती कंपनी एंडेमोलला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, जनतेच्या नजरेसमोर जीवन जगण्याच्या विचारानेच मी अस्वस्थ झालो आहे. पण समाजासाठी काहीतरी करता यावे म्हणून या शोचा भाग बनण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. फार गांभीर्याने विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे की, जर मला माझे रुटीन बदलायचे असेल, घरातील काम करायचे असेल आणि अनोळखी लोकांसाठी रहायचे असेल, तर एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी हे काम करायला पाहिजे, असे त्यांनी पत्रात लिहिले होते.
तीन वर्षांचे प्रयत्न
विश्वास यांना शोमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुमारे तीन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत होते. विश्वास यांना पाच कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आल्याचे वृत्त यापूर्वीच आले आहे. 21 सप्टेंबरपासून या शोला सुरुवात होत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बिग बॉसच्या यंदाच्या पर्वातील संभाव्य कंटेस्टंट्स