आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuresh Said, Darling All Is Right; Trader Kuresh Sunanda Dialogue

कुरेशी म्हणाले, 'डार्लिंग सर्व काही ठीकठाक!' मांस व्यापारी कुरेशी-सुनंदा यांच्यातील संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर प्रकरणात नवा खळबळजनक खुलासा झाला आहे. त्यानुसार मांस निर्यातदार मोइन कुरेशी व सुनंदा पुष्कर यांच्यात २०१३मध्ये ब्लॅकबेरीवर मेसेजेसची (बीबीएम) देवाणघेवाण झाली होती. दोघांनी एकमेकांना डिनरचे निमंत्रण दिले होते. सुनंदा यांनी १७ मार्च २०१३ रोजी मोबाइलवर कुरेशींना मेसेज पाठवला होता. ‘तुझ्या फॅक्ट्रीमध्ये सर्व काही ठीक आहे का? मी तुला खूप मिस केले. बुधवारी आमच्या ९७- लोधी इस्टेटवरील घरी डिनरसाठी ये. मला तसेस शशी व नवीन यांना खूप आनंद होईल -लव्ह सुनंदा.’

कुरेशींनी उत्तर दिले, ‘शुक्रिया, आता सर्व नियंत्रणात आहे. डार्लिंग. मी २० मार्चपर्यंत लाहोरला आहे. परतल्यानंतर भेटतो. डिनरला बोलावल्याबद्दल धन्यवाद. -लव्ह मोईन.' कुरेशी यांनी २१ ऑगस्ट २०१३ रोजी सुनंदा यांना ४० – एके ड्राइव्ह, डीएलएफ छतरपूर फार्म हाऊसवर रात्री नऊ वाजता डिनरला बोलावले होते. सुनंदांनी त्याला, ‘होय डार्लिंग, नक्की येणार
आहे. ' असे उत्तर दिले होते.

सिन्हा व्हिजिटर प्रकरणातही नाव
कुरेशी सध्या आयकर विभागाच्या चौकशीच्या जाळ्यात आहेत. माजी सीबीआयप्रमुख रंजीत सिन्हा यांच्या घरी व्हिजिटिंग लिस्टमध्ये त्यांचेही नाव असून ते सिन्हांना ९० पेक्षा जास्त वेळा भेटले आहेत. त्याच बरोबर २०१३ मध्ये मारल्या गेलेल्या पाँटी चढ्ढांचा छोटा भाऊ राजू चढ्ढासोबतही त्यांनी बीबीएमवर संपर्कात होते. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब
जंग आपल्या कुटुंबासारखे आहेत. कोणतेही काम असेल तर अडचण येणार नाही, असे म्हटले होते. त्यावर राजू चड्ढा यांनी ‘सरजी काँग्रॅच्युलेशन’ असा मेसेज टाकला होता. तसेच मित्रांना बजावण्यात आलेली इंटरपोल नोटीस हटवण्यासाठीही कुरेशी यांनी काही अधिका-यांशी बोलणी
केली होती.