आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींचा सुषमा-वसुंधरांना सल्ला? \'आरोप झाला तर तत्काळ दिला राजीनामा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी वादग्रस्त माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी सोबतच्या कथित संबंधामुळे चर्चेत आलेल्या केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अप्रत्यक्षरित्या राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, जेव्हा माझ्यावर हवाला कांडाचा आरोप झाला होता तेव्ही मी तत्काळ राजीनामा दिला होता. त्याचे मला आजही दुःख वाटत नाही.
अडवाणींना विचारण्यात आले होते, की हवाला प्रकरणात तुमचे नाव आले होते, त्याच दिवशी तुम्ही राजीनामा दिला होता. त्याचे तुम्हाला दुःख वाटते का ? यावर ते म्हणाले, 'मला त्याचे थोडेही दुःख वाटत नाही, मी दोन वर्षे निवडणूक लढू शकलो नव्हतो. तो निर्णय पूर्णतः माझा होता. मला वाटते, की तुमची राजकीय विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. जनता तुम्हाला निवडून देते, त्यांच्या विश्वासाला तुमच्याकडून तडा जाता कामा नये.' अडवाणींचे हे वक्तव्य अशा वेळेस आले आहे, जेव्हा केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारमधील मंत्री सुषमा स्वराज आणि भाजप शासित राजस्थानच्या वसुंधरा राजे यांना क्लीनचिट देत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचा निर्णय झाला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ललित मोदींसोबत सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे