नवी दिल्ली - एकाच नाव आणि पत्त्यावर एकापेक्षा अधिक घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्या लाखो ग्राहकांचे कनेक्शन 31 मार्चनंतर ब्लॉक केले जाणार आहे. डीबीटीएल या योजनेंतर्गत एका आधारकार्डवर एकच सिलिंडरचे अनुदान दिले जाणार आहे. जे ग्राहक गॅस अनुदान योजनेसोबत अजून जोडले गेले नाही त्यांचेही कनेक्शन ब्लॉक केले जाईल. त्यामुळे तुमच्याकडे जर दोन कनेक्शन असतील तर एक परत करण्यातच हुषारी आहे. कारण, 31 मार्चनंतर बाजार भावानुसार सिलिंडर खरेदी करावे लागेल. त्यामुळे दुसरे कनेक्शन असून कोणताही फायदा होणार नाही. मात्र, 31 मार्चपर्यंत पहिले गॅस कनेक्शन परत केले तर, तुमची डिपॉझिट रक्कम परत मिळेल. जर गॅस कनेक्शन परत केले नाही तर तुमचे कनेक्शन अवैध मानले जाईल आणि डिपॉझिट रक्कमही परत मिळणार नाही.
ग्राहकांनी काय करावे
जर तुम्ही संयुक्त कुटुंबात राहात असाल किंवा एका बिल्डिंगमध्ये राहात आसाल तर, तुम्ही वितरकांकडे जाऊन तुमचे नाव सस्पेक्टेड गॅस कनेक्शन यादीत आहे का याची खात्री करून घ्या. जर, तुमचे नाव या यादीत असेल तर, ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा देऊन तुम्ही तुमचे गॅस कनेक्शन वाचवू शकता.
गॅस अनुदानासाठी डीबीटीएलच्या योजनेसोबत जर तुम्ही जो़डले गेले नसाल तर तुमच्या घरी सिलिंडर घेऊन येणारे हॉकर त्यांच्या मोबाईलमधून तुमची आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन घेऊन जाऊ शकतात. त्याआधारावर तुमचे खाते बँकेकडे लिंक केले जाईल. राजस्थानमध्ये ही योजना कार्यन्वीत केली गेली आहे.