आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन खुर्ची सोडणार, जगमोहन दालमिया होणार नवे अध्यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) महत्त्वपूर्ण बैठक चैन्नईत सुरू आहे. या बैठकीनंतर श्रीनिवासन राजीनामा देण्याची शक्यता आहे. जगमोहन दालमिया बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असतील अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यांची नियुक्ती या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत राहील. सप्टेंबरमध्ये बीसीसीआयची निवडणूक होणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार बोर्डच्या सदस्यांनी दालमिया यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, त्यांनी याला समंती दिलेली नाही. त्यामुळे बैठकीनंतरच अध्यक्षपदावरून पडदा उठणार आहे. तत्पूर्वी श्रीनिवासन यांनी बैठकीला जाण्याआधी दालमिया यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याच्यावर आरोप झाले आहेत. या आरोपांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी श्रीनिवासन यांनी पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला आहे.

नव्या अध्यक्षासाठी शशांक मनोहर, अरुण जेटली आणि निरंजन शाह यांच्या नावाचीही चर्चा आहे. बीसीसीआयच्या सचिव पदाचा राजीनामा दिलेले संजय जगदाळे बैठकीत सहभागी होणार नाहीत.


दुसरीकडे, एका नव्या विकीलिक्सची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. यात एक हायप्रोफाईल व्यक्ती दुस-या एका हायप्रोफाईल व्यक्तीची गुपिते उघड करत आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या गडबड-घोटाळ्याची जंत्रीच मांडायला सुरूवात केली आहे.

ललित मोदी आणि एन. श्रीनिवासन दोघेही उद्योगपती. हायप्रोफाईल आणि महत्त्वाकांक्षी देखील. क्रिकेटच्या राजकारणात दोघेही वादग्रस्त ठरले आहेत. तीन वर्षांपूर्वी मोदींनी आयपीएलची गादी सोडली, आणि नंतर देशही. श्रीनिवासन देखील केव्हा पायउतार होतील हे सांगता येत नाही. मोदींना बाजूला करण्यात श्रीनिवासन यांचा हात असल्याचे बोलले जाते. त्याचेच उट्टे आता मोदी काढत असल्याचे दिसत आहे. श्रीनिवासन यांच्याबद्दलची शेकडो वादग्रस्त कागदपत्रे त्यांनी ट्विटरवर अपलोड केली आहेत.

शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी, बीसीसीआयच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जर कोणाकडे कागदपत्र असतील तर ती माझ्याकडे द्या. ती प्रसिद्ध करण्याची मी जबाबदारी घेतो, असे खुले आवाहनच केले आहे.

पुढील स्लाइडमधून वाचा, मोदींचे ट्विट्स.