आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींकडून आता नरेंद्र मोदींची स्तुती, म्हणाले - पंतप्रधान सक्षम व्यक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदी - Divya Marathi
ललित मोदी
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीची मदत केल्याने केंद्रीतील भाजप सरकारमधील परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे वादग्रस्त ठरल्या आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच ललित मोदींनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणारे ट्विट केले आहे. ललित मोदी म्हणाले, 'पंतप्रधान अतिशय हुषार व्यक्ती आहेत, चेंडू सीमापार करण्यासाठी ते सक्षम आहेत.'

काय ट्विट केले ?
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर रिट्विट करताना ललित मोदींनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली आहे. यावरुन नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. ललित यांनी केलेल्या रिट्विटमध्ये म्हटले आहे, 'आपले पंतप्रधान योग्य आणि हुषार व्यक्ती आहेत. त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही. चेंडू मैदानाबाहेर कसा टोलवायचा हे त्यांना माहित आहे. आपण फक्त त्यांचा सन्मान करु शकतो.'
बातम्या आणखी आहेत...