आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Modi Says He Is Not A Fugitive, Hits Out At UPA Government

मी मोठ्या संकटात नाही, ही तर एक सर्कस - ललित मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मला कोणतेही समन्स िमळाले नसून माझ्यावर आयपीएलमधील पैशाच्या अफरातफरीचे लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा खुलासा माजी आयपीएल आयुक्त ललित मोदीने एका वाहिनीला िदलेल्या मुलाखतीदरम्यान
केला आहे.

सोबतच माझ्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप हे राजकीय हेतून प्रेरित असल्याचा बाउन्सर टाकण्यासही आयपीएलचे जनक विसरले नाहीत. मोदीने जुलै महिन्यात केलेल्या सनसनाटी टि्वटपासून घूमजाव करताना आपण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी िकंवा प्रियंका गांधी वढेरा यांची भेट घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी मोदीने जुलै महिन्यात राहुल गांधी आणि त्याचे जावई राॅबर्ट वढेरा यांचा आपण आयपीएल आयुक्त असताना लाभार्थ्यांमध्ये समावेश होता असे िट्वट करून खळबळ उडवून िदली होती.

माझ्या सभोवताली केवळ सर्कस सुरू आहे, एवढाच वाद म्हणावा लागेल, असे मुलाखतीत मोदीने सांगितले. आज तारखेपर्यंत माझ्यावर कोणतेही आरोप नसून तसे समन्सही मला िमळाले नाही. समन्स ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्याचे मला सांगण्यात आले होते, मात्र मला ते आजतागायत िमळाला नाही,असेही मोदीने स्पष्ट केले.

अंडरवर्ल्डकडून जिवाला धोका
माझ्या जिवाला अंडरवर्ल्डकडून धोका होण्याची शक्यता असल्यामुळे मी माझ्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजाेड करण्यास तयार नाही, असे तुम्ही भारतात का परत येत नाही, असे िवचारले असता मोदीने स्पष्टीकरण िदले.