आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींचे सिंगारपूरमधील दोन बँक खाते सील; अटकही होऊ शकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - सिंगापूर सरकारने आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांचे दोन बँक खाते सील केलेत. या बाबत ED आणि CBI ने याचिका दाखल केली होती. शिवाय भारताने सिंगापूरकडे ललि‍त यांच्‍याबद्दल अधिक माहितीही मागितली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अडचणीमध्‍ये वाढ झाली आहे.
एका वृत्‍तवाहिनीसार, ललित मोदी यांच्‍याविषयी भारत आणि सिंगापूरच्‍या अधिकाऱ्यांमध्‍ये चर्चा झाली. त्‍या अनुषंगाने ललित यांचे दोन बँक खाते सील केले गेले.
इंटरपोल देणार रेड कॉर्नर नोटिस
ललित मोदी यांना रेड कॉर्नर नोटिस द्यावी, अशी मागणी CBI ने इंटरपोलकडे केली आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, ही नोटिस या आठवड्यात दिली जाऊ शकते. त्‍यानंतर ललित यांना अटक करून भारतात आणले जाईल.
राठौर यांनी काँग्रेसवर टीका
केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर यांनी काँग्रेसवर टीका करत म्‍हटले ललित यांना अटक करण्‍यासाठी रेड कॉर्नर किंवा ब्लू कॉर्नर नोटिस आवश्‍यक आहे. मात्र, यापूर्वीच्‍या सरकारने असे न करता केवळ नाटकबाजी केली. त्‍यामुळे ललित हे लंडनमध्‍ये मज्‍जेत आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला. शिवाय आता आम्‍ही रेड कॉर्नर नोटिस देऊन त्‍यांना अटक करणार आहोत, असेही त्‍यांनी सांगितले.