आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Modi Wanted Foreign Minister Sushma Swarajs Husband On His Board

ललित मोदींनी सुषमा स्वराज यांच्या पतीला दिली होती \'जॉब ऑफर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: पती स्वराज कौशल यांच्यासोबत सुषमा स्वराज )

नवी दिल्ली- आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याविषयी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ललित मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना जॉब ऑफर दिली होती. आपली कंपनी ‘इंडोफिल’मध्ये डायरेक्टर पदासाठी ललित मोठी यांनी कौशल यांना ऑफर दिली होती. मात्र, ही ऑफर कौशल यांनी यांनी फेटाळली होती, असा दावा एका खासगी वृत्तवाहिनीने केला आहे.

ललित मोदी यांनी कौशल यांना एक ई-मेल पाठवला होता. त्यात मोदी यांनी कौशल यांना इंडोफिल कंपनीत डायरेक्टर पदाची ऑफर दिली होती. मोदींचा हा ई-मेल आपल्याकडे असल्याचा दावा देखील या वृत्तवाहिनीने केला आहे.

मी 20 वर्षांपासून कायदेशीर सल्लागार...
सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण मागील 20 वर्षांपासून ललित मोदींसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत असल्याचे स्वराज कौशल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ललित मोदी यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंटमध्ये मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांनी या प्रकरणी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. कॉंग्रेसने सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, बुधवारी ललित मोदी यांनी एक धक्कादायक ट्वीट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

'भाजपचे नेते वरुण गांधी यांनी काँग्रेससोबतचे वाद मिटवण्यासाठी तब्बल 375 कोटी रुपये मागितले होते', असा गौप्यस्फोट ललित मोदी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. वरुण गांधी यांच्या निकटवर्तीयांनी ललित मोदींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत.
अल्टरनेट डायरेक्टर बनवण्याची ऑफर
दावा करणार्‍या वृत्तवाहिनीनुसार, ललित मोदी यांनी स्वराज कौशल यांना आपल्या कंपनीत अल्टरनेट डायरेक्टर बनण्याची ऑफर दिली होती. मोदीच्या अनुपस्थितीत कौशल हेच बोर्ड मीटिंगला त्यांचे प्रतिनिधित्व करतील. परंतु, ललित मोदींचे अनेक वर्षांपासून वकील राहिलेल्या कौशल यांनी ही ऑफर स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला होता.
कॉंग्रेसने पुन्हा केली राजीनाम्याची मागणी...
कॉंग्रेसचे नेते नेता टॉम वडक्कन यांनी सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. टॉम वडक्कन म्हणाले, 'परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीयगीत गाऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ता जी.व्ही.एल. नरसिंहराव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्वराज कौशल यांनी ललित मोदींची ऑफर फेटाळली होती. कौशल हे मोदींचे कायदेविषयक सल्लागार आहेत. ते त्यांचे प्रोफेशनल रिलेशनशिप कधीही लपवलेली नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ललित मोदींचा नवा ट्विट बॉम्ब....