आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalkrishan Advani News In Marathi, BJP, Rahul Gandhi, New Delhi

भाजप ‘वन मॅन पार्टी', राहुल यांच्या टीकेशी लालकृष्‍ण अडवाणी सहमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा नरेंद्र मोदींना असलेला विरोध पुन्हा एकदा दिसून आला आहे. पक्ष खरंच ‘वन मॅन पार्टी’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे अडवाणी भाजपच्या एका बैठकीत म्हणाले. भाजपवर एकाच नेत्याचा प्रभाव असल्याच्या राहुल यांच्या टीकेशी सहमत असल्याचेही ते म्हणाले.


एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, 27 फेब्रुवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक प्रचार समितीची बैठक झाली. या वेळी उमेदवार यादी जाहीर करण्याबाबत चर्चा सुरू होती आणि मोदी व अडवाणी एकमेकांशोजारीच बसले होते, असे एका नेत्याने सांगितले. या वेळी एका नेत्याने राहुल गांधी यांच्या टीकेचा उल्लेख करत, पक्षाला याचे उत्तर द्यायला हवे असे निदश्रनास आणून दिले. त्यावर ‘वक्तव्यात काहीही चुकीचे वाटत नाही’ अशी प्रतिक्रिया अडवाणींनी दिली. भाजपमध्ये एकाच नेत्याचा प्रभाव वाढत असल्याच्या या वक्तव्याशी सहमत असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर राजनाथसिंह यांनी उमेदवारीबाबत चर्चा सुरू केली, असेही या नेत्याने सांगितले.


प्रचाराबाबत अडवाणी नाराज
अडवाणी यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांची नाराजी स्वाभाविकच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. प्रचारामध्ये सर्व नेत्यांचा समावेश असायला हवा. मात्र, सध्या सगळीकडे केवळ मोदी दिसत आहेत, असे अडवाणींचे मत असल्याचे त्या नेत्याने सांगितले.