आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पितामहां\'ची मनधरणी सुरुच : राजीनामा माघारी घेणार नाही- अडवाणी; मोदींचाही फोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. अडवाणी यांच्‍या राजीनाम्‍यामुळे भाजपमध्‍ये खळबळ उडाली आहे. पक्षातील सध्‍याच्‍या परिस्थितीवर अडवाणी नाराज होते. त्‍यातच नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार समितीचे अध्‍यक्ष बनविण्‍यावरुनही ते नाराज होते. दरम्‍यान, भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी अडवाणींचा राजीनामा फेटाळला आहे. त्‍यामुळे राजीनामा देऊन अडवाणी दबावतंत्र वापरत आहेत का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. राजीनामा दिल्‍यानंतर भाजपचे नेते हादरले आहेत. वेकय्या नायडुंनी अडवाणींची भेट घेतली. अनंतकुमारही राजनाथ सिंह यांच्‍या निवासस्‍थानी दाखल झाले आहेत. तर सुषमा स्‍वराज आणि एस. एस. आहुलुवालिया हे दोघेही एकत्रपणे अडवाणींच्‍या निवासस्‍थानी दाखल झाले आहेत. अडवाणींची समजूत काढण्‍यात यशस्‍वी होऊ, असे स्‍वराज यांनी सांगितले. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अरुण जेटलीदेखील अडवाणींच्‍या निवासस्‍थानी दाखल झाले आहेत. जेटली आणि मोदींचीही चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांना दुरध्‍वनीवरुन संपर्क करुन राजीनामा मागे घेण्‍याची विनंती केल्‍याचीही माहिती सुत्रांनी दिली. एकूणच अडवाणींची भाजपकडून मनधरणी करण्‍यात येत आहे.

अडवाणी यांच्‍या राजीनाम्‍यानंतर एनडीएमध्‍येही लवकरच फुट पडण्‍याची शक्‍यता आहे. जेडीयुचे प्रमुख शरद यादव यांनी एनडीएमध्‍ये राहण्‍याबाबत विचार करावा लागेल, असे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे एनडीएच्‍या भवितव्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी सांगितले की, अडवाणीच्‍या राजीनाम्‍यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल. अडवाणीच्‍या पाठोपाठ त्‍यांना मानणारे नेतेही भाजपमधून बाहेर पडतील, असे वैद्य म्‍हणाले.

अडवाणी यांनी संसदीय समिती, निवडणूक समिती तसेच राष्‍ट्रीय कार्यकारीणीच्‍या सदस्‍य पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, ते एनडीएचे अध्‍यक्ष राहणार आहेत. तसेच भाजपचे सदस्यही ते राहणार आहेत. गोव्‍यात झालेल्‍या राष्‍ट्रीय कार्यकारीणीच्‍या बैठकीत अडवाणी यांना जाण्‍याचे टाळले होते. प्रकृती अस्‍वस्‍थाचे कारण त्‍यांनी दिले होते. या बैठकीतच नरेंद्र मोदीच्‍या प्रचार समितीच्‍या अध्‍यक्षपदी निवडीची घोषणा करण्‍यात आली. अडवाणींचा मोदींना विरोध होता. परंतु, पक्षामध्‍ये मोदींच्‍याच नावाची लाट आली आहे. या लाटेवर अडवाणींना स्‍वार व्‍हायचे नव्‍हते. त्‍यामुळे पक्षाच्‍या एकूण वाटचालीवर अडवाणी नाराज होते. नेते पक्षाच्‍या हितापेक्षा वैयक्ति‍क स्‍वार्थाला महत्त्व देत असल्‍याचे अडवाणी यांनी राजीनाम्यात म्‍हटले आहे. अटल बिहारी वाजपेयी, श्‍यामाप्रसाद मुखर्जी आणि मी ज्‍या पक्षासाठी काम केले, तो हा पक्ष नाही. पक्षात ज्‍या पद्धतीने काम सुरु आहे, त्‍यात आपल्‍याला काम करणे कठीण असल्‍याचेही अडवाणी यांनी म्‍हटले आहे.

अडवाणी यांनी काल ब्‍लॉगही लिहीला होता. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले होते की, हिटलर आणि मुसोलिनी यांना नरकात जावे लागले होते. तर पोप स्‍वर्गात गेले होते. या ब्‍लॉगमधून त्‍यांनी पक्षात फोफावणा-या हुकुमशाही वृत्तीवर टीका केली होती. या टीकेचा रोख मोदींवर होता.

पुढे वाचा... अडवाणींची सटकलीः जेठमलानींचा टोला..