आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू यादव म्हणाले, मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहूणे; घराणेशाही-जातीप्रथेवर केले भाष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना बिहारमध्ये आमदरांच्या बंडाळीनंतरही घराणेशाहीचे समर्थन केले आहे. एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात जेव्हा लालू यादव यांना प्रश्न विचारण्यात आला, आरजेडीमधील बंडखोरीला तुमचे मेहूणे जबाबदार आहेत का, त्यावर लालू यादव म्हणाले, प्रत्येक घरांमध्ये मेहुण्यांना सन्मान असतो. ते नेहमी आजू-बाजूलाच असतात. प्रत्येक घरामध्ये त्यांचे स्थान हे विशेष असते.
यादव यांनी प्रश्नकर्त्याला सांगितले, की तुम्ही जर मुख्यमंत्री झाले तर, तुम्हालाही मेहूणे मंडळींना आसपास ठेवावे लागले.
जातीप्रथेबद्दल लालू यादव म्हणाले, 'समाज याला कधीही सोडणार नाही. मी वैयक्तीक अंतरजातीय विवाहांचे समर्थन करतो. मात्र, आजही अनेक आई-वडीलांची इच्छा असते, त्यांच्या मुला-मुलींनी आपापल्या जातीतच लग्न करावे.'