आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

950 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात झाली होती अटक, संसदेने बर्खास्त केलेले पहिले खासदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालू यादव - Divya Marathi
लालू यादव
पाटणा- बिहार विधानसभेचे काउंट डाऊन सुरु झाले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) जनता दल संयुक्त आणि काँग्रेसच्या महाआघाडीसोबत 101 जागांवर निवडणूक लढवत आहे. यांच्या विरोधात आहे एनडीए. एनडीए त्यांच्या प्रचारात वारंवार भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आहे. आरजेडी नेते लालू यादव यांना दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (30 सप्टेंबर 2013) चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते आणि तीन दिवसांनी शिक्षा सुनावण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत रांची येथील बिरसा मुंडा केंद्रीय तुरुंगात त्यांची रवानगी केली होती. या शिक्षेनंतर त्यांचे राजकारण संपले असेच बोलले जात होते. निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीला शिक्षेची पाच वर्षे आणि त्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे लालू यादवांना 11 वर्षे लोकसभा आणि विधानसभा लढता येत नाही.

काय होता चारा घोटाळा, किती कोटींचा घोटाळा, कोणा-कोणावर होते आरोप याची आज 'बिहार फ्लॅशबॅक' मध्ये divyamarathi.com आपल्या वाचकांना माहिती देत आहे.


काय होता चारा घोटाळा


बहुचर्चित चारा घोटाळा 1996 मध्‍ये उघड झाला होता. हा एकूण 950 कोटी रुपयांचा घोटाळा असल्‍याचे बोलले जाते. परंतु, सीबीआय चौकशीमध्‍ये 37 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला. त्‍यावेळी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री लालू यादव यांना राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, त्‍यांनी पत्‍नी राबडी देवीला मुख्‍यमंत्रीपदावर बसवून तुरुंगातूनच कारभार चालवला. चारा घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्‍यमंत्री जगन्‍नाथ मिश्र यांनाही दोषी ठरविण्‍यात आले होते. याशिवाय अनेक आयएएस अधिकारीही घोटाळ्यात अडकले. या निकालानंतर राष्‍ट्रीय जनता दलाला मोठा फटका बसला आहे. लालू यादव यांच्‍यासाठी तर मोठा धक्‍का बसला होता, त्‍यांची राजकीय कारकिर्द संपल्‍यातच जमा असल्याचे मानले जात होते परंतू आता ते बाहेर आहेत आणि बिहार विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचे दावेदार आहेत.
घोटाळ्याचा घटनाक्रम
20 फेब्रुवारी 1996- चायबासाचे तत्‍कालीन उपायुक्त अनिल खरे यांनी 1994-95 मध्‍ये पशुपालन विभागातून 34.64 कोटी रुपयांची रक्‍कम बेकायदेशीरपणे राजस्‍व विभागतून काढण्‍यात आल्‍याप्रकरणी तक्रार दाखल केली. सीबीआय तपासात ही रक्‍कम 37.70 कोटी रुपयांची असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.
19 मार्च 1996- सर्वोच्‍च न्‍यायालयाने सीबीआय तपास सुरुच ठेवण्‍याचे निर्देश दिले.
23 जून 1997- सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्‍यासह 56 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले
31 जुलै 1997- लालू यादव यांनी सीबीआय न्‍यायालयात शरणागती पत्‍कारली. ते तीन महिने तुरुंगात राहून जामीनावर सुटले.
5 एप्रिल 2000- पाटणा सीबीआय विशेष न्‍यायालयात आरोप निश्चित करण्‍यात आले.
14 फेब्रुवारी 2012- लालू प्रसाद यादव यांनी साक्ष नोंदविली.
24 जून 2013- चाईबासा प्रकरणी लालू यादव यांच्‍या वकीलांनी सीबीआयचे विशेष न्‍या. प्रवास कुमार सिंह यांना बदलण्‍याची मागणी केली.
13 ऑगस्‍ट 2013- सर्वोच्‍च न्‍यायालयाने लालू यादव यांची न्‍यायमुर्तींना बदलण्‍याची मागणी फेटाळली.
30 सप्‍टेंबर- न्‍या. प्रवास कुमार सिंह यांनी लालू यादव यांच्यासह 45 जणांना दोषी ठरविले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण कोणाला कसे देत होता पैसे