आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत \'आजम खान मुर्दाबाद\'च्या घोषणा; लालूप्रसाद यादव संतापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मुलायम सिंह यांच्या घराबाहेर आंदोलन करताना हिंदु सेनेचे कार्यकर्ते)
नवी दिल्ली- मागील दोन दशकांपासून परस्परांवर कुरघोडीचे राजकारण करणारे जनता दल परिवारातील सहा पक्षांचे बुधवारी विलीनीकरण झाले. मात्र, मुलायम यांच्या घरी एकत्र आलेल्या राजद, जदयू आणि अन्य दलांच्या नेत्यांना हिंदु सेनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आजम खानविरोधात हिंदु सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुर्दाबादच्या घोषणा ‍दिल्या.
आजम खान यांनी रामपूरमध्ये 80 वाल्मीकी कुटुंबीयांना इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडले, असा हिंदु सेनेने आरोप केला आहे. रामपूर हा आजम खान यांचा विधानसभा मतदार संघ आहे.
16 अशोका रोड, दिल्ली स्थित मुलायम यांच्या निवासस्थानी बैठक जनत‍ा परिवारातील नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर लालू, मुलायम, नीतीशकुमार, शरद यादव आणि एचडी देवगौडा मीडियाला संबोधित करण्‍यासाठी लॉनमध्ये आले असता घराबाहेर हिंदु सेनेचे कार्यकर्ते 'आजम खान मुर्दाबाद', 'धर्म परिवर्तन बंद करो' अशा घोषणा देत होते. त्यावर लालू प्रसाद यादव संतापले. 'कोण ओरडतोय बाहेर, सगळ्यांना पळवून लावा', असे लालूंनी सुरक्षारक्षकांना आदेश दिले. लालूंचा राग शांत न झाल्याचे पाहुन सुरक्षारक्षकांनी फोनवरून दिल्ली पोलिसांना हिंदुसेनेच्या आंदोलनाची माहिती दिली. पो‍लिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून हिंदुसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हिंदू सेनेच्या आंदोलनाचे फोटोज...