आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Yadav And Three Others Loses Parliamentary Seat

लालूंसह तिघांचे सदस्यत्व रद्द होणार, कायदा मंत्रालयाची संसद सचिवालयास शिफारस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चारा घोटाळ्यातील दोषी आरोपी व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे खासदार जगदीश शर्मा, काँग्रेचे राज्यसभा खासदार रशीद मसूद यांची खासदारकी लवकरच रद्द होणार आहे. यासंदर्भात कायदा मंत्रालयाने संसदीय सचिवालयास शिफारस केली आहे. त्यामुळे त्याची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कलंकित खासदारांसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा फटका चारा घोटाळ्यातील दोषी आरोपी लालूप्रसाद यादव, जदयू खासदार जगदीश शर्मा, तसेच वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया घोटाळ्यातील दोषी काँग्रेस खासदार रशीद मसूद यांना बसला होता. या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा केल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संसदीय सचिवालयाने दोषी
नेत्यांच्या खासदारकीबाबत कायदा मंत्रालय, तज्ज्ञांना सल्ला मागितला होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे या तीनही नेत्यांचे पद जाणार आहे. न्यायालयाचा कलंकित नेत्यांबाबतचा निर्णय दहा जुलैपासून लागू झाला आहे.