आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंची कन्या मीसा भारतीचे दिल्लीतील फार्महाऊस जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी ED कडून कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीसा आणि त्यांचे पती शैलेष भारती यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. - Divya Marathi
मीसा आणि त्यांचे पती शैलेष भारती यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे.
नवी दिल्ली/ पाटणा - लालू यादवांची मुलगी मीसा भारतीचे फार्महाऊस ईडीने (इन्फोर्समेंट डायरेक्टरेट) जप्त केले आहे. दिल्ली जवळील बिजवासन येथे मीसाच्या मालकीचे फार्महाऊस आहे. मीसा आणि तिचा पती शैलेष भारतीविरोधात 8000 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण असून ईडी त्याचा तपास करत आहे. 
 
8 जुलैला पडले होते छापे 
- मीसा भारती आणि तिचा पती शैलेष यांच्याविरोधात मनी लाँन्ड्रिंगचे प्रकरण असून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. 
- 8 जुलैला मीसाच्या दिल्लीतील 3 ठिकाण्यांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने शैलेषची 8 तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर ईडीचे अधिकारी शैलेषलासोबतही घेऊन गेले होते. 
 
जैन ब्रदर्सचीही केली चौकशी 
- ईडीने मीसा भारतीच्या मालकीच्या तीन ठिकाणी छापे टाकले होते. त्यात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळा नजीक असलेले बिजवासन फार्महाऊस, सैनिक फार्म आणि घिटोरनी या ठिकाण्यांचा समावेश होता. 
- याशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी जैन ब्रदर्स बीरेंद्र आणि सुरेंद्र कुमार यांच्या ठिकाण्यांवरही सर्च ऑपरेशन केले होते. जैन ब्रदर्सविरोधातही मनी लाँड्रींग प्रकरणी तपास सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...