नवी दिल्ली - नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभात राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीच आेढून आलिंगन दिले होते. त्याचा अर्थ त्यांच्याशी ‘आघाडी’ झाली असा नव्हे, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने आम आदमी पार्टीवर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्याने
केजरीवालांना सोमवारी त्यावर भूमिका मांडावी लागली.
बिहारच्या निवडणुकीत आपने भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर जाहीरपणे महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नितीश कुमार यांना पाठींबाही दिला होता. नितीश कुमार एक चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहिला आहे. आम्ही सर्व राष्ट्रपती भवनात गेलो होतो. नितीश कुमार यांच्या शपथविधी समारंभात लालू प्रसाद यादव व्यासपीठावर होते. त्यांनी हस्तांदोलन केले. त्यांनी मला आेढत माझे आलिंगन घेतले. त्यावरून गहजब झाला आहे. माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. प्रश्न विचारले जात असल्याचा मला आनंद आहे. कारण आमचा पक्ष वेगळा आहे, असा विचार आता सर्वांकडून होऊ लागला आहे. इतर नेत्यांची गळाभेट घेतल्यानंतर कोणी असा सवाल केला नव्हता. म्हणूनच आमच्यादृष्टीने हे बरेच झाले. परंतु आम्ही कायम भ्रष्टाचाराच्या विरोधात राहिलो आहोत. भविष्यातही या भूमिकेत बदल होणार नाही. लालूंचे दोन मुले मंत्री झाले आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात उभे टाकलो आहोत, असे केजरीवाल म्हणाले. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले केजरीवाल..