आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Prasad Yadav News In Marathi, Prime Minister, India, Divyamarathi

एक दिवस मीही पंतप्रधान होईल! माझे स्वप्न अजूनही भंगलेले नाही- लालूप्रसाद यादव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची अजूनही पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान व्हायचं स्वप्न अजूनही भंगले नसल्याचे लालूप्रसाद यादव यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

लालूप्रसाद म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीवर त्यांनी कक्ष केंद्रीत केले आहे. राष्‍ट्रीय जनता दल काँग्रेसबरोबर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. विशेष म्हणजे आमच्याबरोबर लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवानही असणार आहेत. भाजपचे नरेंद्र मोदी आणि 'आप'चे अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी आम्ही कॉंग्रसबरोबर आघाडी केली आहे.

यावेळी लालूंनी भाजप आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. एवढेच नाही तर चारा घोटाळातून स्वत: निर्दोष सुटका होईल, असेही लालूंनी म्हटले.