आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिकपणाची बक्षिसी म्हणून लॅपटॉप, राउटरची ऑर्डर असताना पेटीएमने पाठवला लॅपटॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी मोबाइल काॅमर्स कंपनी पेटीएमने एका ग्राहकाला चुकून लॅपटॉप पाठवला. पुन्हा त्याच ग्राहकाला त्याच्या प्रामाणिकतेचे बक्षीस म्हणून तोच लॅपटॉप भेट म्हणूनही देऊन टाकला. दिल्लीतील अनुज चौहान असे या भाग्यवान तरुणाचे नाव आहे. त्याने १० एप्रिल रोजी पेटीएमच्या वेबसाइटवरून वाय-फाय राउटरची ऑर्डर दिली होती, परंतु कंपनीने त्याला १६ एप्रिल रोजी डेल कंपनीचा लॅपटॉप पाठवून दिला.

या घटनेनंतर हैराण झालेल्या अनुजने त्याच्या फेसबुक पेजवर लिहिले की, डिलिव्हरी बॉयच्या हातात मोठा बॉक्स पाहिल्यानंतर मी त्याला ही वस्तू माझी नाही. हे मी ऑर्डर केलेले नाही असे म्हटले, परंतु तो ठाम होता. त्याने मला बॉक्सवरील डिटेल्स व पत्ता तपासून पाहायला सांगितला. तो तपशील बरोबर होता. नाव, फोन नंबर व इतर डिटेल्स बरोबर होता. मला वाटले त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पॅकिंग मोठे केले असेल. चौहानने ऑर्डर दिलेल्या वाय-फाय राउटरची किंमत १,१४५ रुपये होती व कंपनीने पाठवलेला लॅपटॉप होता
३०, ००० रुपयांचा. तो त्यांनी कंपनीकडे परत पाठवण्याची तयारी दाखवली. त्यानंतर कंपनीने च्या ऑर्डरची खातरजमा केली. त्यात गफलत झाल्याचे लक्षात आले.

व्यापा-याची चूक
पेटीएम कंपनीने अनुजची प्रामाणिकता पाहून त्याचा गौरव करण्याचा निर्णय घेतला व तोच लॅपटॉप त्याला भेट म्हणून दिला. पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, जेव्हा अनुजने फेसबुकवर टॅग केल्यानंतर आम्ही ऑर्डर तपासली. तेव्हा पुरवठादार व्यापा-याची चूक असल्याचे आढळून आले, परंतु अनुजची प्रामाणिकता पाहून आम्ही तो लॅपटॉप त्याला भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला व तो त्याला भेट केला.