आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Largest Circulated Multiedition Daily Is Dainik Bhaskar In This World

हा गर्वाचा क्षण: दैनिक भास्कर आता जगातील चौथे सर्वाधिक खप असलेले वृत्तपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनिक भास्करच्या वाचकांसाठी नववर्षाचा शुभारंभ एका अभिमानास्पद बातमीने झाला आहे. देशातील सर्वात मोठे वृत्तपत्र दैनिक भास्कर आता जगातील चौथे सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र झाले आहे. वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स (वॅन इन्फ्रा) या जगप्रसिद्ध संस्थेच्या अहवालानुसार जगभर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांत दैनिक भास्कर खपाच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकावर आहे. या अहवालात टॉप पाच वृत्तपत्रांत भारतातून फक्त दैनिक भास्करला स्थान मिळाले आहे.

योमीउरी शिनबुन हे जपानचे वृत्तपत्र पहिल्या स्थानी आहे. जपानमधीलच असाही शिनबुनला दुसरे तर अमेरिकेतील यूएसए टुडे या वृत्तपत्राला तिसरे स्थान मिळाले आहे.
२०१५ या वर्षात दैनिक भास्करने अनेक ऐतिहासिक यशाेशिखरे गाठली आहेत. अलीकडेच ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ABC) या वृत्तपत्र क्षेत्रातील विश्वासार्ह संस्थेने जानेवारी-जून २०१५ च्या आपल्या अहवालात दैनिक भास्करला सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घोषित केले आहे. त्याशिवाय काही दिवसांआधी आय ब्रँड ट्रस्ट-२०१५ च्या अहवालानुसार, दैनिक भास्कर भारतीय भाषांत देशातील सर्वात विश्वसनीय ब्रँडही आहे.
आमच्या कोट्यवधी वाचकांचे प्रेम आणि त्यांच्या अतूट विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. आमच्या वाचकांना जागतिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ वृत्तपत्र देणे, समाजात वाचकांना पुढे ठेवेल आणि त्यांचे जीवन आणखी चांगले करण्यासाठी दररोज काहीतरी नवे, जास्तीचे आणि वेगळे देणे, हा भास्करचा नवीन वर्षाचा संकल्प आहे.

टॉपची पाच वृत्तपत्रे
वृत्तपत्र देश भाषा खपाचे आकडे
योमीउरी शिनबुन जपान जपानी ९१.९० लाख
असाही शिनबुन जपान जपानी ६८.०९ लाख
यूएसए टुडे अमेरिका इंग्रजी ४१.३९ लाख
दैनिक भास्कर भारत हिंदी ३५.५७ लाख*
मॅनिची जपान जपानी ३३.६० लाख

*ABC च्या जानेवारी-जून २०१५ च्या अहवालानुसार दैनिक भास्करची वितरण संख्या आता ३६,६९,६१६ झाली आहे.