आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ हल्ल्यातील मास्टरमाइंड अबूसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा; श्रीनगरमध्ये एन्काऊंटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/श्रीनगर - अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू इस्माईलचा श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला. नौगाममध्ये ही चकमक झाली. यात अबूसह आणखी एका अतिरेक्याला ठार करण्यात आले. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

बऱ्याच काळापासून सुरक्षा दल अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईलचा शोध घेत होते. त्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अबू पाकिस्तानचा रहिवासी होता. तो तीन वर्षांपासून काश्मिरात सक्रिय होता. तपास संस्थांनी अबू इस्माईलला हुडकून काढण्यासाठी दक्षिण काश्मीरवर खास लक्ष दिले होते.
 
किती लोक मारले गेले होते?
अनंतनाग येथे 10 जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. यात 5 महिला यात्रेकरुंसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. 15 जण जखमी झाले होते. हे सर्वजण अमरनाथ यात्रेवरुन जम्मूला परत येत होते. 
 
कसे कळाले अबू इस्माइल होता मास्टरमाइंड 
- तपास यंत्रणांनी अबू इस्माइलचा शोध घेण्यासाठी दक्षिण काश्मीरमध्ये लक्ष्य केंद्रीत केले होते. त्यांच्या माहितीनुसार अबू एक वर्षापासून या भागात सक्रीय होता. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. सुरक्षा यंत्रणांनी टेक्निकल सपोर्ट आणि इंटेलिजिन्स रिपोर्टच्या आधारावर त्याचा शोध सुरु केला होता. टेक्निकल इंटरसेप्शन्सनेच हे स्पष्ट झाले होते की अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. 
 
कोणी लीड केले होते ऑपरेशन 
- काश्मीरचे आयजी मुनीर खान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की पाकिस्तान निवासी अबू इस्माइलने 4 दहशतवाद्यांसह हल्ला केला होता. अबूनेच या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. त्यांनी 9 जुलैरोजीही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोख बंदोबस्त असल्यामुळे त्यांना काहीही करता आले नव्हते. 
- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील संबूरा भागात 7 ऑगस्टला लष्कर-ए-तोएबाचा उमर नावाचा दहशतवादी सुरक्षा रक्षकांनी ठार केला होता. तो अबूच्या ग्रुपचा सदस्य असल्याची माहिती होती. हा देखील अनंतनाग हल्ल्यात सहभागी होता. 
बातम्या आणखी आहेत...