आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lashkar E Taiyaba Planning More 2611 Type Attacks In India

26/11 सारख्या हल्ल्याचा कट, LeT ला PAK नेव्ही देत आहे ट्रेनिंग : रिपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दहशतवादी संघटना लश्कर-ए-तौयबा (LeT) भारतविरुद्ध मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे. सात वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यासारखा हल्ला घडवून आणण्याचे दहशतवादी नियोजन करत आहेत, असा इशारा गुप्तचर संस्थेने दिला आहे.

देशात सार्वजनिक स्थळी किंवा एखाद्या आर्मी यूनिटवर हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तान नेव्ही LeT च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचे दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्‍यात आला आहे. गुप्तचर संस्थेच्या इशार्‍यानंतर देशातील मोठ्या शहरात तसेच समुद्र किनार्‍यावर अलर्ट जारी करण्‍यात आला आहे.

'न्यूज चॅनल 'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संस्था ISI व नेव्हीचे जवान लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला सहकार्य करत आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानी नेव्ही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. देशात मोठा हल्ला घडवून आणण्‍याचे दहशतवादी नियोजन करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, जम्मूमधील उधमपूरमध्ये बीएसएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात दोन जवान शहीद झाले होते. मोहम्मद नवेद याकूब नामक पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. त्यानंतर कश्मीरमधील एक ऑपरेशनमध्ये आर्मी-पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात आणखी एका पाकिस्तानी दशतवाद्याला अटक झाली होती. सज्जाद अहमद असे त्याने नाव आहे.

पाकिस्तानात मुंबईतील 26/11च्या हल्ल्याच्या धर्तीवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. लश्कराच्या दशतवाद्यांनी कराची नेव्हल पोर्टवरील एक जागा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे या कामात पाकिस्तान नेव्हीचे जवान दहशतवाद्यांना सहकार्य करत आहेत. 26 नोव्हेंबर 2008 ला 11 पाकिस्तानी दहशतवादी कराचीहून समुद्रमार्गे मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी रक्तरंजीत होळी खेळली होती. यात एकूण 164 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर 308 जण जखमी झाले होते. मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पडण्यात आले होते. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली होती.