आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lashkar Planning Attack In India For Obama Visit

ओबामांच्या भारत दौर्‍यावेळी फरार दहशतवाद्यांकडून घातपात करण्याचा लष्करचा इरादा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईत 26/11 चा हल्ला घडवून आणणारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबा पुन्हा एकदा हदरवून सोडणारा हल्ला करण्याचे षडयंत्र रचत आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येत आहेत. एका इंग्रजी वेबसाइटने सुरक्षा यंत्रणांतील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, परदेशी गुप्तचर संस्थांनी भारतीय गुप्तचर संस्थेला या संबंधीचे अलर्ट जारी केले आहेत.
वेबसाइटच्या वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणांनी ऑक्टोबरमध्ये मध्यप्रदेशातील एका तुरुंगातून फरार झालेल्या पाच दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. या फरार आरोपींवर सिमी संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप करण्यात आला होता. गुप्तचर संस्थांनी काही फोन कॉल्स स्ट्रेस केले आहेत, त्यावरुन लष्करचे काही म्होरके या फरार दहशतवाद्यांच्या संपर्कात आहेत आणि ते त्यांना या दहशतवादी कारवाईच्या सुचना देत आहेत.
या फरार आरोपींकडूनच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर गृहमंत्रालयाने सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना दिल्या आहेत.