आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेडियो इंटरसेप्टकडून खुलासा: सर्जिकल स्ट्राइकमध्ये ठार झाले होते लश्करे-तैयबाचे 20 दहशतवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामुला/ नवी दिल्ली: पीओकेमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे सर्वात जास्त नुकसान लश्करे-तैयबाला झाला आहे. भारतीय सैन्याच्या या कार्यवाहीमध्ये लश्करे तैयबाचे जवळपास 20 दहशतवादी ठार झाल्याचा खुलासा रेडियो इंटरसेप्ट्सच्या असेसमेंट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. लश्करे तैयबा ही एक पाकिस्तानचा पाठींबा असलेली प्रतिबंधीत दहशतवादी संघटना आहे. काय झाला आहे खुलासा..
- न्यूज एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार, हे असेसमेंट रिपोर्ट्स भारतीय लष्करच्या फिल्ड युनिट्सजवळ आहेत.
- यामध्ये पाकिस्तान आर्मी आणि इतर अनेक दहशतवादी संघटनादरम्यान रेडिओवर झालेला संवाद रेकॉर्ड आहे.
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मीने सर्जीकल स्ट्राईक दरम्यान पीओकेमध्ये असलेली दहशतवाद्यांची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. यामध्ये लश्करे तैयबाचा दुदनियाल या ठिकाणाचाही समावेश आहे.
- पीओकेमध्ये दुदनियाल ठिकाण हे उत्तर कश्मिरच्या कुपवाडा सेक्टरच्या विरूध्द दिशेला आहे.
- पीओकेमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये एकूण 38 दहशतवादी ठार झाले होते.

उरी हल्ल्यामागे होता लश्करे तैयबाचा हात
- 18 सप्टेंबरला झालेल्या उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईकचे प्लानिंग केले होते.
- इंडियन आर्मीकडून सुरूवातीला उरी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर एनआयएच्या तपासात या हल्ल्यात लश्करे तैयबाचा हात असल्याचे समोर आले.
केल आणि दुदनियालमध्ये ४ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली
- सुत्रांनी रविवारी माहिती दिली की, 'आर्मी डिव्हिजनच्या ५ टीम्सना केल आणि दुदनियालमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याचे मिशन देण्यात आले होते.
- पुर्णपणे विचार केल्यानंतर हे ऑपरेशन 28 आणि 29 सप्टेंबर दरम्यान सुरू करण्यात आले.
- या दरम्यान इंडियन आर्मीने LoC पार करून 4 दहशतवादी ठिकाणे नष्ट केली. ही ठिकाणे पाकिस्तानी पोस्टच्या देखरेखीखाली चालवण्यात येत होती. हे पोस्ट LoC पासून 700 मीटरच्या अंतरावर आहे.
बातम्या आणखी आहेत...