आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या: चार वर्षांत निर्वासितांच्या संख्येत जगात चाैपट वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातील अनेक देशांत युद्ध, शोषण आणि संघर्षामुळे निर्वासितांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या हाय कमिशनर फॉर रेफ्युजी (यूएनएचसीआर) यांच्या अहवालात ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘वर्ल्ड अॅट वॉर’ शीर्षकाच्या अहवालात निर्वासितांबद्दलचे वास्तव समोर आले आहे. अलीकडेच सिरियातील लाखो लोक मायदेश सोडून युराेपच्या दिशेने जात असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. शेजारी तुर्कीमध्ये स्थलांतर करण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. आगामी काही महिन्यांत युरोपात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संख्या १० लाखांवर पोहोचू शकेल, असा धोका व्यक्त झाला आहे.
आकड्यांत वास्तव
>०६ कोटी लोकांना जगात युद्धामुळे गेल्या वर्षी स्थलांतरित.
>१.९५ कोटी देशातून बाहेर स्थलांतरित
>१८ लाख आश्रयाच्या शोधात.
>३.८२ कोटी मायदेशात बेघर.

५३ टक्के निर्वासित केवळ तीन देशांत
जगातील एकूण १.९५ कोटी लोक इतर देशांत निर्वासित झाले आहेत. त्यात सिरिया, सोमालिया आणि अफगाणिस्तानातील १.४४ कोटी (५३ टक्के) नागरिकांचा समावेश आहे.

भारतातही स्थिती बरी नाही
२०१४ पर्यंत भारतात १०.४३३ निर्वासित आणि १६,७०९ निर्वासित आश्रयाची मागणी करणारी प्रकरणे प्रलंबित. सध्या देशात १ लाख ९९ हजार ९३७ निर्वासित राहत होते आणि ५ हजार ०७४ नागरिक आश्रय मिळावा, अशी मागणी करत आहेत.
>८३ लाख वाढले गेल्या वर्षी निर्वासित. यूएनच्या हाय कमिशनर फॉर रेफ्युजी (यूएनएचसीआर) च्या ग्लोबल ट्रेंड्सच्या वर्ल्ड अॅट वॉरच्या अहवालानुसार

>४२,५०० लोक सरासरी प्रति दिवशी निर्वासित होतात. त्यात गेल्या चार वर्षांत चौपटीने वाढ झाली.

>५.१२ कोटी लोक २०१३ मध्ये स्थलांतरित झाले होते.

>१२२ लोकांपैकी प्रत्येकी एक व्यक्ती निर्वासित, स्थलांतरित किंवा आश्रयाच्या शोधात अफगाण, सोमालिया

>गेल्या वर्षी सर्वाधिक निर्वासित (३८.८ लाख नागरिक) सिरियातून झाले. त्यानंतर अफगाणिस्तान (२५.९ लाख) आणि सोमालिया (११.१ लाख).

>आम्ही एक मोठे परिवर्तन पाहत आहोत. सध्याच्या परिस्थितीतील ही सर्वात मोठी हानी म्हणावी लागेल. जगभरात स्थलांतरित वाढले आहेत. या समस्येसमोर सर्व प्रकारचे प्रयत्न कमी पडू लागले आहेत. असे यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही.
-एनटोनियो गटर्स, यूएनएचसीआर.
बातम्या आणखी आहेत...