आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन म्हणाले वेळप्रसंगी केंद्र सरकारलाही ‘नाही’ म्हणण्याची क्षमता रिझर्व्ह बँकेत असायला हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रघुरामराजन रविवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त होत आहेत. शनिवारी दिल्लीत सेंट स्टीफन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी गव्हर्नर म्हणून आपले शेवटचे भाषण केले.

राजन म्हणाले, तीन वर्षांच्या कार्यकाळात कुणाचीही भीती बाळगता, बाजू घेता जे सर्वाेत्तम करणे शक्य होते, ते मी केले. आरबीआय पुढेही आव्हानांच्या काळात असेच काम सुरू ठेवेल, अशी मला आशा आहे. सरकारला ‘नाही’ म्हणण्याची क्षमता रिझर्व्ह बँकेने अबाधित ठेवली पाहिजे. कारण, देशाला मजबूत स्वतंत्र केंद्रीय बँकेची गरज आहे. तथापि, या बँकेला बंधनांपासून मुक्त ठेवता येणार नाही. कारण तिला सरकारी कायद्यानुसार काम करावे लागते. माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची आठवण सांगताना राजन म्हणाले, सुब्बाराव मला एकदा म्हणाले होते, ‘एकेदिवशी अर्थमंत्री म्हणतील की रिझर्व्ह बँकेकडून मी इतका त्रस्त आहे की बाहेर फिरायला जावेसे वाटते आहे...पण सुदैव रिझर्व्ह बँक इथे राहील.’ तांत्रिक जाण नसलेल्या काही सरकारी संस्था रिझर्व्ह बँकेवर लक्ष ठेवून असतात. यामुळे निर्णय प्रक्रियेला फटका बसतो, असेही राजन म्हणाले.

माझ्या उत्तराधिकाऱ्यांनी बँकेला नवी उंची द्यावी
हेमाझे शेवटचे जाहीर भाषण. यानंतरचा वेळ पण मी देशासाठीच देईन. माझ्या उत्तराधिकाऱ्यांनी या बँकेला नव्या यशोशिखरावर न्यावे, अशी माझी इच्छा आहे. मी देशासाठी काम केले याचा अभिमान आहे. तुम्ही देशाचे भविष्य, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली हा आनंद आहे, असेही राजन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...