आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Late British Priminister Chachil's Three Love Story

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवंगत ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांचे तीन प्रेमकथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ब्रिटनचे दिवंगत पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यावर जीव ओवाळून टाकणा-या असंख्य तरुणी त्या काळी होत्या. त्यांच्या चार्मची कल्पना सर्वांनाच आहे, परंतु हा चार्मिंग पीएमदेखील त्याकाळच्या तीन सर्वात तरुण सुंदरींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, हे वाचून आश्चर्य वाटेल. यातील एक अमेरिकी अभिनेत्रीदेखील होती.

अमेरिकी चरित्रकार मायकल शेल्डेन यांनी लिहिलेल्या ‘यंग टायटन : द मेकिंग ऑफ विन्स्टन चर्चिल’ पुस्तकात चर्चिल यांच्या गुलाबी कथांचा उल्लेख आहे. रोमँटिक, महत्त्वाकांक्षी, गूढता, ग्लॅमर असे चर्चिलच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यात रेखाटण्यात आले आहेत. जगाच्या नकाशावर लंडन शहर सर्वाधिक चर्चेत होते. त्या काळी एक तरुण आणि लोकप्रिय नेत्याचा उदय होत होता. तो हा काळ होता. चर्चिलच्या डायरी, काही पत्रांतून पूर्वायुष्यातील खरी गोष्ट समोर आली आहे. वयाच्या 26 व्या वर्षी संसदेत केलेले भाषण, त्यानंतरची अनेक संसदीय चर्चेतील त्यांची भाषणे, मायक्रोफिल्म्सचा आढावा घेतल्यानंतर चर्चिलच्या वाटचालीचा अंदाज बांधून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.


प्रत्येक वेळी नकार
अमेरिकी अभिनेत्री एथेल बेरीमोर हिच्यावर चर्चिल यांचे प्रेम होते. त्यांनी बेरीबोरला अनेकदा प्रपोजही केले, परंतु प्रत्येक वेळी तिने चर्चिल यांचा प्रस्ताव फेटाळला. हेच पामेला प्लॉडेन आणि मुरिएल विल्सन या दोन सुंदर तरुणींनी केले. म्हणून चर्चिल यांनी प्रेम केले, परंतु त्यात ते अपयशी ठरले. मात्र, सर्व तरुणी आयुष्यभराच्या मैत्रिणी बनून त्यांच्यासोबत राहिल्या. मात्र, प्रेयसी होऊ शकल्या नाहीत.