आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Article News On Atal Bihari Vajpayee By Ashok Tandon

अटल बिहारी वाजपेयींना गुरू मानत कॉंग्रेसचे दिग्विजय सिंग; ममता बॅनजींचेही प्रेरणास्थान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा आज (बुधवारी) 89 वा वाढदिवस आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 'राजधर्मा'ची आज खूप चर्चा सुरु आहे. राजधर्माचे पालन केल्याशिवाय राज्याचे कामकाज सुरळीत चालुच शकत नाही. मात्र, आताचा जमाना आघाडीचा आहे. त्यामुळे राजकारणात युती धर्म हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतानाही दिसत आहे. अटल बिहारी यांनी यांच्या कार्यकाळात युतीधर्माचे उत्तम पालन केले होते.
कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग अटल बिहारी वाजपेयींना गुरू मानत तर ममता बनर्जी त्यांच्या विरोधात एक शब्दही खपवून घेत नसत. अटल बिहारी वाजपेयी हे आजही ममता बॅनर्जींचे प्रेरणास्थान आहेत.
भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ सिंग यांनी बुधवारी अटल बिहारी वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. हर्षवर्धन होते.