आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi News AAP National Council Meeting Today

आलिशान बंगल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा नकार, केजरीवाल \'आप\'चे पंतप्रधानपदाचे उमेदवार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी लुटियान झोनमधील 10 खोल्यांच्या डुप्लेक्स बंगल्यात राहण्यास नकार दिला आहे. आज (शनिवार) माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सरकारी डुप्लेक्समध्ये राहाणार नसल्याचे म्हटले आहे. मी सध्या गाझियाबाद येथील कौशिंबी येथे राहातो आणि तेथेच राहाणार आहे. आज आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीआधी केजरीवाल यांनी, 'मला अनेक फोन आले आणि त्यांनी डुप्लेक्स मध्ये राहु नये अशी सुचना केली,' त्यामुळे मी तिथे न राहाण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता आम आदमी पार्टीचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत लोकसभा निवडणूकीची रणनीती ठरवली जाणार आहे. बैठकीच्या आधी आपचे नेते योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांना देशाचे आगामी पंतप्रधान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यादव यांनी या पर्यायावरही विचार झाला पाहिजे, असे म्हटले आहे.

आम आदमी पार्टीने हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाब यांसारख्या छोट्या राज्यांतून लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. याशिवाय देशातील इतरही मोजक्या जागा ते लढविण्याची शक्यता आहे. आपचे नेते कुमार विश्वास यांनी अमेठीमधून निवडणूक लढविण्याची याआधीच तयारी दर्शविली आहे. याशिवाय मुंबई, बंगळुरु यांसारख्या मेट्रोसिटीमधूनही आप लोकसभेसाठी उमेदवार उभे करणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, राहुल - मोदी विरुद्ध ठऱणार रणनीती