आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi Aap Arvind Kejriwal Ntpc Power Cuts Electricity Rates

\'आप\'च्या सरकारला वीज कंपन्यांचा शॉक, दर निम्म्यावर आणल्यानंतर \'सरचार्ज\'चा भार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टी सरकारच्या स्वस्त दरात वीज देण्याच्या निर्णयाला वीज कंपन्यांनी 440 व्होल्टचा जोरदार झटका दिला आहे. बीएसईएस-राजधानी, बीएसईएस-यमुना आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी अनुक्रमे 6, 8 आणि 7 टक्के सरचार्ज वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ आजपासून (शनिवार) लागू होणार आहे.

इलेक्ट्रिसिटी रेग्यूलेटरी कमिशनने शुक्रवारीच याची घोषणा केली होती. वीज कंपन्यांच्या या निर्णयामुळे दिल्लीकरांना निम्म्या दरात वीज उपलब्ध करुन देण्याच्या केजरीवाल सरकारच्या निर्णयाला खो बसला आहे. याआधी बीएसईएस- यमुनाने पैशांच्या कमतरतेमुळे शनिवारपासून 10 तासांचे भारनियमन करण्याची घोषणा केली होती. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली होती. वीज कंपन्या सरकारला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. केजरीवाल म्हणाले होते, की जर वीज कंपन्यांनी 8 ते 10 तासांचे भारनियमन केले तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.
सरचार्जचा भार ग्राहकांवर
केजरीवाल यांनी दिल्लीतील वीज दरात 50 टक्क्यांच्या कपातीचा निर्णय सत्तेवर आल्यानंतर 48 तासांत घेतला होता. याचा फायदा 400 युनिटपर्यंत वीज खर्च असणा-या ग्राहकांना होणार आहे. मात्र, आता वाढीव सरचार्जमुळे ऐकूण वीजच महागणार आहे. त्यामुळे हा वाढीव भार ग्राहकांवरच पडणार आहे.
एनटीपीसीचे हात वर
आम आदमी पार्टी आणि केजरीवाल सरकराला सर्वात मोठा झटका नॅशनल थर्मल पॉवर प्लँटने (एनटीपीसी) दिला आहे. एनटीपीसीने म्हटले होते, की जोपर्यंत त्यांची बीले मिळत नाही तोपर्यंत पूर्व दिल्लीला वीज पुरवठा करणारी कंपनी बीएसईएस-यमुनाला वीजपुरवठा केला जाणार नाही. दिल्ली सरकारने शुक्रवारी दुपारी विनंती केल्यानंतरही एनटीपीसीचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या समस्यतून तोडगा काढण्यासाठी वीज कंपन्या आणि एनटीपीसी यांच्यात आज (शनिवार) देखील चर्चा झाली. मात्र आजच्या चर्चेत तोडगा निघाला की नाही याची अद्याप माहीती मिळालेली नाही.