आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi News AIIMS Sunanda Pushkar\'s Autopsy Report Shashi Tharoor

सुनंदा पुष्करचा मृत्यू विषबाधेमुळेच, चौकशीचे आदेश; सुनंदाकडे 115 कोटींची संपत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहावर अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेत (एम्स) पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्याचा अहवाल दिल्ली पोलिसांना सादर करण्यात आला आहे. सुनंदा पुष्करचा मृत्यू विषबाधेमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा, असा आदेश प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जाणून घ्या काय आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये
- सुनंदाच्या शरीरात दारुचा अंश सापडलेला नाही.
- सुनंदाच्या चेहऱ्यावर आणि हातांवर दहापेक्षा जास्त खरचटल्याच्या खुणा आहेत. परंतु, त्या जीवघेण्या नाहीत.
- सुनंदाचा मृत्यू नैसर्गिक नाही.
- अल्प्राजोलमचे अतिसेवन तिच्या मृत्यूचे कारण असू शकते.
- या औषधाच्या अतिसेवनामुळे बेशुद्ध होणे किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते.
- सुनंदाचा मृत्यू विषबाधेने झाला असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आत्महत्याचे शक्यता फेटाळून लावत नाही तर त्याची पुष्टीही करीत नाही.
सुनंदा पुष्करकडे होती 115 कोटी रुपयांची संपत्ती, वाचा पुढील स्लाईडवर