आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय चार दिवसांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा पेच चार दिवसात सोडवण्यात येईल. त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयात वैयक्तिक विचारांना काहीही स्थान नाही. नियमात जे असेल त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. अ‍ॅटर्नी जनरल यांचे पत्र मला पाहावे लागेल. त्यानंतर नियमांचे अवलोकन केले जाईल. 1969 मध्ये लोकसभेत पहिल्यांदा विरोधी पक्षनेता होता. त्याअगोदर कोणत्याच पक्षाला हे पद मिळाले नव्हते. 1980 ते 84 दरम्यानदेखील विरोधी पक्षनेता नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच काँग्रेसच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचेच जणू त्यांनी संकेत दिले आहेत.