आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi News Sunanda Pushkar's Son Shiv Menan Speak About Sunanda's Death

माझी आई आत्‍महत्‍या करुच शकत नाही -सुनंदांचा मुलगा शिव मेननचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- माझी आई आत्‍महत्‍या करुच शकत नाही. तिला आत्‍महत्‍येसाठी प्रवृत्‍त केले गेले असावे, असा खळबळजनक आरोप सुनंदा पुष्‍कर यांचा मुलगा शिव मेनन याने केला आहे.

तो पुढे म्‍हणाला, की माझ्या आईला ओळखणारा प्रत्‍येकजण सांगू शकतो, की ती आत्‍महत्‍या करुच शकत नाही. ती कणखर होती. शशी तिला सांभाळण्‍यासाठी सक्षम नव्‍हते. ती एकांतात जास्‍तकाळ राहिल्‍याने तिने आत्‍महत्‍या केली असावी. तो पुढे म्‍हणाला, की शशी थरुर आणि सुनंदा दोघेपण एकमेकांवर प्रेम करत असले तरी त्‍यांच्‍यामध्‍ये वारंवार भांडणे होत होती.

न्‍यायाधीशांनी दिल्‍ली पोलिसांना सुनंदा पुष्‍कर यांच्‍या मृत्‍युविषयी अधिक तपास करण्‍याचे आदेश दिले आहेत. शवविच्‍छेदनाच्‍या अहवालानुसार त्‍यांचा मृत्‍यू विषामुळे झाला असल्‍याचे अहवालात म्‍हटले आहे.

एम्‍स हॉस्पिटलच्‍या शवविच्‍छेदन अहवालानुसार 52 वर्षीय सुनंदा पुष्‍कर यांचा मृत्‍यू आकस्मिक आणि अनैसर्गिक होता. तसेच त्यांच्या चेह-यावर व हातांवर दहा-बारा जखमा होत्या.

दिल्‍लीतील हॉटेल लिलामध्‍ये पुष्‍कर मृतावस्‍थेत आढळल्‍या होत्‍या. पाकिस्‍तानी महिला पत्रकारासोबत शशींचे कथित प्रेमप्रकरण असल्‍याचा संशय असल्यामुळे सुनंदांनी आत्‍महत्‍या केल्‍याचा शशींवर आरोप होत आहे. सुनंदा यांच्‍या मृत्‍यूच्‍या एका दिवसापूर्वी 'मी सुखाने लग्‍न करणार', असल्‍याचे शशी थरुर बोलले होते. 'तिच्‍या जाण्‍याने सर्व काही संपले', असल्‍याचे शिव मेनन याने म्‍हटले आहे.