आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Marathi News Vinod Kumar Binny, Shoaib Iqbal Ultimatum To AAP Arvind Kejriwal

\'आप\'विरोधातील मोर्चे बांधणी सैल; बिन्नी गायब, केजरीवालांच्या भेटीनंतर इक्बालांचा सूर बदलला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीतून बडतर्फ करण्यात आलेले आमदार विनोदकुमार बिन्नी यांच्यासह बंडाचा झेंडा फडकविणारे अपक्ष आमदार शोएब इक्बाल आणि रामवीर शौकीन यांनी केजरीवाल सरकारला समर्थन सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. सोमवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही अपक्ष आमदारांना तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी समर्थन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घटनाक्रमामध्ये बंडखोर आमदार बिन्नी मात्र आज दिवसभर कुठेच दिसलेले नाहीत. त्यांनी सोमवारी पाच आमदार आमच्यासोबत असतील असा दावा केला होता.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीनंतर माध्यमाच्या प्रतिनिधींना इक्बाल म्हणाले, केजरीवाल यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आमच्या पाच प्रमुख मागण्या होत्या. त्यात 700 लिटर मोफत पाणी, महिलांसाठी सुरक्षा रक्षक यांचा समावेश होता. इक्बाल यांच्या या वक्तव्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहे, की याच जर त्यांच्या मागण्या होत्या तर, यासाठी त्यांनी केजरीवाल सरकारला अल्टिमेटम का दिले. बिन्नींनी जे पाच आमदार सोबत येतील असा दावा केला होता त्यांनी साथ देण्यास नकार दिला का? याआधी बिन्नी केजरीवालांविरोधात बेमुदत धरणे धरणार होते मात्र, तीनच तासांत त्यांच्या आंदोलनाची समाप्ती झाली होती.
एका दिवसापूर्वी दिले होते अल्टिमेटम
बंडखोर आमदार बिन्नी आणि त्यांच्यासोबत जेडीयूचा राजीनामा दिलेले आमदार शोएब इक्बाल व अपक्ष आमदार रामवीर शौकीन यांनी केजरीवाल सरकारने जनतेला दिलेली आश्वासने 48 तासांत पूर्ण करावी अन्यथा पाठिंबी काढून घेण्याची धमकी दिली होती. त्याच बरोबर बिन्नी यांनी त्यांच्या संपर्कात आपचे पाच आमदार असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, सोमवारी दुपारी ते पाच आमदार आमच्या सोबत असतील. बिन्नींनी दावा केला होता, की त्यांच्यासोबत अनेक आमदार आहेत. त्यांना सोबत घेऊन संयुक्त मोर्चा स्थापन करण्याचा विचार आहे. रविवारी उशिरा रात्री यासंबंधीचा निर्णय घेऊन सोमवारी घोषणा केली जाईल असे त्यांनी सांगितले होते.
दुस-याच दिवशी बिन्नी - इक्बाल - शौकिनचे बंड झाले थंड
विनोदकुमार बिन्नी, शोएब इक्बाल आणि रामवीर शौकिन यांनी रविवारी घोषणा केली होती, की त्यांच्यासोबत आणखी पाच आमदार आहेत आणि ते सोमवारी समोर येतील. आज दुपारी इक्बाल माध्यमांसमोर आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचे सांगत त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले. दुसरीकडे बिन्नी मात्र आज दिवसभर अदृश्यच झाले.
पुढील स्लाइडमध्ये, कोणत्या मागण्यांसाठी दिले होते अल्टिमेटम