आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Congress Election Committee, Divya Marathi

राणे प्रचार समितीचे, तर चव्हाण समन्वय समितीप्रमुख, शिंदेंकडे जाहीरनामा समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसच्या प्रचार समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची, तर समन्वय समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली.

काही दिवसांपूर्वीच राणे यांनी काँग्रेस विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. त्या वेळी राणे यांनी काँग्रेस सोडून जाऊ नये म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या प्रचार समितीचे प्रमुखपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते बुधवारी काँग्रेस पक्षाने पूर्ण केले. त्याशिवाय चव्हाण आणि शिंदे यांना समित्यांचे प्रमुखपद देऊन पक्षाने कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा समतोल साधला, असे दिसते.
काँग्रेस निवडणूक समित्यांवर, एम.एम. शेख, अब्दुल सत्तार
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गठित केलेल्या प्रचार, समन्वय व जाहिरनामा अशा विविध समित्यांवर मराठवाड्यातील खासदार राजीव सातव, रजनीताई पाटील, आमदार अब्दुल सत्तार, एम.एम. शेख, दिलीपराव देशमुख आदींचा समावेश आहे. तर उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे.

समन्वय समिती : अशोक चव्हाण (अध्यक्ष), सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, नारायण राणे, मुरली देवरा, गुरुदास कामत, पतंगराव कदम, हुसेन दलवाई, जाहीरनामा समिती : सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत शिवाजीराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, राजीव सातव, रजनीताई पाटील, दिलीपराव देशमुख.

सचिन सावंत, नितीन राऊत, नसीम खान, जनार्दन चांदूरकर, वर्षा गायकवाड, वसंत पुरके, विजय वडेट्टीवार, अनंत गाडगीळ, कृपाशंकरसिंह, हुसेन दलवाई आदींचा समावेश आहे.