आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'न्यायाधीशांची इच्छा होती मी दारू प्यावी; म्हणाले, ख्रिसमसला प्यावीच लागते'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए.के.गांगुली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणा-या लॉ इंटर्न महिलेने तीन न्यायाधीशांच्या समितीला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खळबळजनक आरोप केले आहेत. महिला वकिलाने चौकशी समितीला सांगितले, की मी वारंवार नकार देत आणि थांबवत असतानाही न्यायाधीशांनी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
लॉ इंटर्न महिलेने चौकशी आयोगाला त्या दिवशी नेमके काय घडले होते याची माहिती दिली. त्यानुसार, न्या. गांगुलींनी संशोधनात मदत करण्यासाठी अनेकवेळा विनंती करुन तिला मध्य दिल्लीतील पंचतरांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. न्या. गांगुली तेव्हा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सांगण्यावरुन एका सामन्यादरम्यान झालेल्या हिंसेची न्यायालयीन चौकशी करीत होते. लॉ इंटर्न महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा फेडरेशनचे प्रतिनीधी हॉटेलमधून गेले तेव्हा न्या. गांगुलींनी तिला मद्य पिण्याचा आग्रह केला. त्यावेळी गांगुलींनी अनेक ग्लास रिचवलेले होते.
त्यावेळी न्या. गांगुली म्हणाले होते, की ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मद्य घेतले पाहिजे. पीडित महिला जेव्हा हॉटेलच्या रुममधून बाहेर निघाली तेव्हा गांगुलींनी लॉबीपर्यंत तिच्या मागे पळत माफी मागितली. महिला वकिलाचे म्हणणे आहे, की तिच्याकडे हे सर्व पूरावे आहेत. मात्र, न्या. गांगुली या प्रकरणात स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत आहेत.