आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व मंत्रालयांवर पीएमओची कडक निगराणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्व मंत्रालयांवर यापुढे पंतप्रधान कार्यालयाची निगराणी राहणार आहे. विविध मंत्रालयांच्या कामकाजात वेग आणि पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यालयात संयुक्त सचिवांची मोठी टीम तयार करणार आहेत. त्यासाठी पीएमओमध्ये आणखी नऊ संयुक्त सचिवांची नेमणूक केली जाणार आहे.
सध्या पीएमओमध्ये संयुक्त सचिवांची संख्या नऊ एवढीच आहे. नवीन नियुक्तीनंतर ती 18 वर जाईल. अधिवेशनानंतर लगेचच नवीन नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्याच्या संयुक्त सचिवांवर कामाचा बोजा अधिक आहे. एका सचिवाकडे चार ते पाच विभागांचा कारभार आहे. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधानांनी संयुक्त सचिवांकडे दोन ते तीन विभाग ठेवण्यात यावेत, असे मत मांडले आहे. नवीन व्यवस्था तयार झाल्यानंतर संयुक्त सचिव आपल्या विभागांचा नियमित प्रगती अहवाल तयार
करू शकतील.