आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Advani Says Nehru Had Called Patel A Total Communist

निझामावर कारवाईवरून नेहरूंनी पटेलांना जातीयवादी ठरवले होते; अडवाणींचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरदार वल्लभभाई पटेलांवरून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. जवाहरलाल नेहरू यांनी पटेलांना ‘जातीयवादी’ संबोधल्याचा दावा त्यांनी एका पुस्तकाच्या आधारे केला आहे. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणासाठी तत्कालीन गृहमंत्री पटेल यांनी लष्कर पाठवण्याची सूचना केली होती. त्या वेळची ही घटना आहे.

आपल्या ब्लॉगवरील पोस्टमध्ये अडवाणी यांनी एमकेके नायर यांच्या ‘द स्टोरी ऑफ एन एरा टोल्ड विदाऊट इल विल’ या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. यात हैदराबादेतील पोलिस अँक्शनच्या आधी झालेल्या कॅबिनेट बैठकीत नेहरू व पटेलांमध्ये वाद झाल्याचा उल्लेख आहे. अडवाणी लिहितात, हैदराबादच्या निझामाची पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती. शेजारी देशात एक दूतही पाठवला होता. तेथील सरकारला पैसाही पुरवला गेला. या बाबी पटेल यांनी कॅबिनेटसमोर मांडल्या. हैदराबादेतील रझाकारी संपवण्यासाठी लष्कर पाठवण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यावर नेहरू म्हणाले की, तुम्ही जातीयवादी आहात. तुमची शिफारस कधीच मान्य करणार नाही. त्यानंतर पटेल कागदपत्रे घेऊन बाहेर पडले होते.