आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Arvind Kejriwal Meet North East Student To Justice For Nido

केजरीवाल म्हणाले, नीडोच्या हत्यारांना मिळेल फाशीची शिक्षा;...तर पोलिसांवरही कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशचे कॉंग्रेसचे आमदार नीडो पावित्रा यांचा मुलगा नीडो तानियाच्या हत्येविरोधात जंतर मंतरवर धरणे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवारी) भेट घेतली. त्यांच्यासोबत शिक्षणमंत्री मनीष सिसौदिया हेही होते. दिल्ली सरकारने याप्रकरणी न्यायदंडाधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

केजरीवाल म्हणाले, नीडोच्या हत्येतील दोषींना फासावर लटकावले जाईल. नीडोच्या हत्येत पोलिस जबाबदार असतील तर त्यांनाही सोडले जाणा नाही. पोलिस चौकशीत या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले असते. परंतु आता न्यायदंडाधिकारी याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगून दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पो‍लिस या प्रकरणात आरोपी आहेत.

नीडोच्या हत्येनंतर दोन दिवसांनी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यामुळे केजरीवाल यांनी खंत व्यक्त केली. एफआयआर आपला मौलिक अधिकार असल्याचेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

पुढील स्लाइडवर वाचा, राहुल गांधीही बराच वेळ बसले आंदोलक विद्यार्थ्यांसोबत...