आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले अध्यात्मिक संत आसाराम बापूंच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे, लक्ष्मीबाई या पती आसाराम यांच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत. आपला पती निर्दोष असल्याचाही दावा लक्ष्मीबाईंनी केला आहे.
लक्ष्मीबाई म्हणाल्या, आसाराम यांनी विवाहानंतर अवघ्या सात वर्षांत संसारातून विरक्ती घेतली होती. त्यांनी ब्रह्मचर्य स्विकारले होते. त्यामुळे ते असे दुष्कर्म करणार नाही. त्यांना फसवले जात असल्याचेही लक्ष्मीबाईंनी सांगितले. आसाराम यांच्या अटकेनंतर यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी पहिल्यांदा आपल्या पतीला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, आसाराम बापू यांनी आपले सहयोगी तसेच साधकांसाठी एका वेबसाईटवरून दिवाळीचा शुभसंदेश दिला आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून दिवाळीचा संदेश देऊन आसाराम यांनी आपले सहयोगी व साधकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'सभी साधक जैसे पहले दिवाली मनाते थे, वैसे ही अभी दिवाली मनाएं, जो आत्मा अंदर है, वही बाहर है। धैर्य रखें, मैं सबको घर में ही दर्शन दूंगा।' असा संदेश आसाराम यांनी दिला आहे. याशिवाय समाजात पसरवल्या जात असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन केले आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, 'काय म्हणाल्या लक्ष्मीबाई'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.