आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांविरुद्धच्या नोटिशीला दिल्ली कोर्टाची स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमधील पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात त्यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती.
चव्हाण यांनी 2009 मध्ये भोकरमधून विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु खर्चाचा दिलेला हिशेब योग्य नसल्याने अपात्र घोषित का करण्यात येऊ नये? अशी नोटीस आयोगाने त्यांना बजावली होती. आयोगाच्या नोटिशीला चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने नोटिशीला स्थगिती देत चव्हाणांविरुद्ध तक्रार देणारे भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी, किरीट सोमय्या व माधवराव किन्हाळकर यांना नोटीस बजावली आहे. उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

चव्हाणांवर प्रचाराची जबाबदारी! : मोघे
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत प्रचाराची धुरा अशोक चव्हाणांकडे सोपवण्यासंबंधी दिल्लीत निर्णय होत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.