आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Chhattisgarh Student Locked Up And Gang Raped For Two Days

नोकरी देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थीनीवर दोन दिवस सामुहिक बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : देशभरात वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर पकडत आहे.

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीमध्ये नोकरीचे आमीष दाखवून 21 वर्षीय तरुणीवर दोन दिवस सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या मुलीला बंदी बनवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या कांकेर येथील रहिवासी आणि पदवीच्या प्रथमवर्षाची विद्यार्थीनी असलेल्या या तरुणीला दोन तरुणांनी प्लेसमेंट कंपनीचे मालक असल्याचे सांगून फसवले. या संस्थेच्या बनावट कॉलवर जेव्हा ही तरुणी मुलाखतीसाठी आली, त्यावेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीने एका वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या आधारे सुमारे आठ महिन्यांपूर्वी नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यावरून काही दिवसांपूर्वी आरोपींनी तिला फोन करून विमानतळ परिसरात नोकरी देण्याचे आमीष दाखवले होते.
मुलाखतीला बोलावण्यात आल्याने ही तरुणी आपल्या एका नातेवाईकाबरोबर दिल्लीला आली होती. ती एका हॉटेलमध्ये थांबली. त्यानंतर तिने 'प्लेसमेंट कंपनी'ला मुलाखतीसाठी फोन केला. आरोपी तरुण एका प्लेसमेंट कंपनीचा मालक असल्याचे नाटक करत होता. आरोपीने त्याचा सहकारी अजयला कॅब ड्रायव्हर बनवून मुलीला आणण्यासाठी पाठवले. मुलाखतीनंतर मुलीला नोकरी निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. नोकरी जॉईन करेपर्यंत तिला कंपनीच्या गेस्टहाऊसमध्ये राहण्यासाठी विचारणा करण्यात आली. त्यांनी त्यांच्या खासगी फ्लॅटला कंपनीचे गेस्ट हाऊस असल्याचे सांगितले.
त्याच रात्री तरुणी गेस्ट हाऊसवर शिफ्ट झाली. त्यावेळी आरोपीने मित्राच्या मदतीने तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि दोन दिवस तिच्यावर बलात्कार करत राहिला. त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ही तरुणी कशीबशी त्यांच्या तावडीतून पळण्यात यशस्वी झाली. त्यानंतर तीने पोलिसांत तक्रार दिली. वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.