नवी दि्ल्ली - हरियाणाचे भाजप नेते आणि किसान मोर्चाचे अध्यक्ष ओ.पी. धनकड यांनी 'निवडणुकीत विजयी झालो तर, बिहारी नवरी फुकटात मिळवून देईल' असे, वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धनकड हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या वक्तव्याच पूर्वांचलमधील अनेक संस्थांसह राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारीक अन्वर यांनी धनकड यांच्या वक्तव्यावर भाजपने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. जनता दल (यू) नेत्यांनी धनकड यांचा निषेध करताना लग्न हे दोघांच्या संमतीने होते, तो खरेदी - विक्रीचा व्यवहार नसल्याचे म्हटले आहे. बिहारचे भाजप नेते सुशील मोदी यांनी धनकड यांचा बचाव केला. ते म्हणाले, 'माध्यमांनी मोड-तोड करुन त्यांचे वक्तव्य प्रसारित केले आहे.' तर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मी धनकड यांचे वक्तव्य ऐकलेच नसल्याचे सांगून या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले भाजप नेते धनकड?
हरियाणामध्ये शुक्रवारी एका जाहीर सभेत बोलताना धनकड यांनी भाजपला विजयी केले तर सर्वांना नवरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, 'सध्या हरियाणामधील तरुणांना बिहारी मुलींशी विवाह करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागते. मात्र राज्यात जर भाजपचे सरकार स्थापन झाले तर, त्यांना बिहारी नवरीसाठी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. बिहारचे भाजप नेते
सुशील कुमार मोदी माझे चांगले मित्र आहेत. त्यांना सांगून बिहारी नवरीसाठी पैशांच्या देण्या-घेण्याची पद्धत बंद करु. मी स्वतः हरियाणातील अविवाहितांसाठी नवरी घेऊन येईल आणि त्यांचे लग्न धुमधडाक्यात लावून देईल. त्यानंतर हरियाणात कोणीही अविवाहित राहाणार नाही.'
हरियाणाची सामाजिक समस्या
हरियाणामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण खूप कमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 879 स्त्रिया आहेत. स्त्रियांचे प्रमाण कमी असल्यामुळे राज्यातील अनेक तरुण अविवाहित राहात आहेत. बिहार आणि झारखंडच्या गरीब कुटुंबाना पैसे देऊन त्यांच्या मुलींशी विवाह केल्याची अनेक प्रकरणे राज्यात उघड झाली आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, धनकड यांच्या वक्तव्यावर
ट्विटरवर आल्या प्रतिक्रिया
छायाचित्र - चंदिगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ओ.पी.धनकड.