आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Arvind Kejriwal And Aap Delhi Assembly Polls Last Day Of Campaigning

दिल्ली विधानसभा निवडणूक : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केजरीवाल आणि \'आप\' चर्चेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आज (सोमवार) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची (आप) जोरदार चर्चा आहे. माध्यमांमध्ये 'आप' आणि अरविंद केजरीवाल जसे चर्चेत आहे तसेच सोशल मीडियावरही त्यांचीच चर्चा आहे. Twitter वर सोमवार सकाळपासून #KejriwalStormsDelhi ट्रेंड करत आहे. दुपारी #AAP ट्विटर ट्रेंडमध्ये सातव्या क्रमांकावर आले.
'आप'ने स्वतः केलेल्या एका सर्व्हेक्षणाचा अहवाल रविवारी सार्वजनिक केला त्यात त्यांनी 44 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. या सर्व्हेमुळे आज दिवसभर 'आप' आणि अरविंद केजरीवाल यांची माध्यमात जोरदार चर्चा सुरू आहे.
विविध हिंदी-इंग्रजी दैनिकांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसंबंधीत सर्व्हेक्षण प्रकाशित केले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने पहिल्या पानावर गेल्या सहा महिन्यात केले गेलेले सर्व्हे प्रकाशित केले आहेत. त्यात 'आप' कांग्रेस आणि भाजपचे गणित बिघडविणारा पक्ष ठरणार असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे योगेंद्र यादव यांनी स्वबळावर बहुमत मिळविण्याचा केलेला दावाही आज, दिवसभर चर्चेत होता. यावर व्यंगात्मक टीका देखील होत आहे.
पुढील स्लाइडमध्ये, सुषमा स्वराज यांनीही साधला 'आप'वर निशाणा