नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे दिल्ली विधानसभा निवडणूकीचे प्रभारी नितीन गडकरी यांनी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत डील केल्याचा आरोप केला आहे. 'आप'सह केजरीवाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. केजरीवाल म्हणाले, 'गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असे म्हणणे चुकीचे आहे. 'आप'ने काँग्रेस किंवा भाजप कोणत्याही पक्षासोबत डील केलेली नाही. गडकरींकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे' असे आव्हान त्यांनी दिले आहे. मात्र, सुत्रांच्या हवाल्याने मीडियामध्ये बातम्या येत आहेत, की केजरीवाल यांनी लोधी रोडवरील 'अमन' हॉटेलमध्ये तीन उद्योगपतींसोबत बैठक केली होती.
हॉटेल अमनमध्ये केजरीवाल यांनी ज्या उद्योगपतींसोबत बैठक केल्याचा आरोप होत आहे, त्यातील एक दिल्लीतील खान मार्केटमध्ये रिटेल चेनचे मालक आहेत. दुसरे उद्योगपती दुचाकी वाहानांचे उत्पादक असल्याचे सांगितले जात आहे. तर तिसरे उद्योगपती हे दिल्लीतील कॉर्पोरेट लॉबीमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहे.
'आप'च्या समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हे भाजपचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. भाजप खोटा प्रचार रेटून करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांना देणगीची गरज असते, त्यामुळे उद्योगपतींना भेटण्यात गैर काहीही नाही असेही 'आप' समर्थकांचे म्हणणे आहे.
या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, 'भाजप आम्हाला घाबरत आहे. त्यामुळेच असे बिनबुडाचे आरोप करत आहे.'
पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले गडकरी...