आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला मुलांचा रक्तपिपासू ड्रॅक्युलासारखे सादर केले जाते- आसाराम यांचा युक्तिवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपात तुरुंगात असलेले आसाराम यांच्या संबंधीच्या वृत्त प्रसारणावर बंदी घालण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. आसाराम यांच्या संबंधी इलेक्ट्रॉनिक आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसारित आणि प्रकाशित होणा-या बातम्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. सरन्यायाधीश पी. सतशिवम यांच्या पीठासमोर आज (शुक्रवार) झालेल्या सुनावणी दरम्यान, आसाराम यांना हिंदी चॅनलवर ड्रॅकूला, जो लहान मुलांचे रक्त पितो, असे सादर केले जात असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. याआधी 21 ऑक्टोबर रोजीही वृ्त्तप्रसारणावर बंदी घालवी अशी याचिका दाखल केली गेली होती. ती देखील कोर्टाने फेटाळली होती.
तव्हा कोर्ट म्हणाले होते की, वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील वृत्तांवर बंदी घालता येणार नाही. मात्र माध्यमे सुप्रीम कोर्टाच्या 2012 च्या नियम आणि अटींचे उल्लंघन करत असेल तर तुम्ही पुन्हा बंदीची मागणी करणारी याचिका दाखल करु शकता.
आसाराम यांचे वकील म्हणाले, माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की, त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांना मुली पुरवत होत्या. वकीलांनी दावा केला की, दोन हिंदी चॅनल आसाराम यांच्या विरोधात खोटा प्रचार करत आहेत. त्यावर कोर्टाने आसाराम यांच्या वकीलांना म्हटले की, यासाठी इतरही उपाय आहेत. केवळ सुप्रीम कोर्टच त्यासाठी शेवटचा पर्याय नाही.