आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Sardar Patel Statue Of Unity Narendra Modi

\'युपीए\'पेक्षा \'एनडीए\'ने केले सरदार पटेलांकडे दुर्लक्ष्य! आता नरेंद्र मोदींना चर्चेचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस आणि युपीए आघाडी सरकारला टिकेचे लक्ष्य करणा-या नरेंद्र मोदींना केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. वाद-विवादासाठी जागा आणि वेळ मोदींनी ठरवावे असेही सिब्बल म्हणाले आहेत. सिब्बल यांचा आरोप आहे की, मोदी केवळ वैयक्तिक मुद्दे उपस्थित करीत आहेत आणि त्यांच्या भाषणात फक्त एकच राज्य केंद्रस्थानी असते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यानंतर सिब्बल यांनीही मोदींना खोटारडे म्हटले आहे. ते म्हणाले, मोदी माझ्याशी चर्चाच करू शकत नाही. मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही ते वाद-विवादात काय सहभाग घेतील. सिब्बल यांनी मोदींच्या खोटारडेपणावर एका शेरमधून हल्ला केला आहे. ते म्हणाले 'दोपहर तक सारे बाजार में झूठ बिक चुका था लेकिन हम शाम तक सच की दुकान लगाए बैठे।'
मोदींनी सरदार पटेल यांच्यावरून काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने सरदार पटेल यांना उपेक्षीत ठेवले असा त्यांचा आरोप आहे. गुरुवारी (31 ऑक्टोबर) पटेल यांच्या 138 व्या जयंतीनिमीत्त नर्मदेच्या किना-यावर त्यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याचे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा शिलान्‍यास करण्‍यात आला. या कार्यक्रमात मोदी म्हणाले, आतापर्यंत काँग्रेस सरदार पटेलांना विसरली होती. मात्र यंदा देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या जाहिरीती देण्यात आल्या आहेत. हा गुजरात इफेक्ट आहे.
या भाषणानंतर मोदी पुन्हा एकदा खोटे बोलत असल्याचे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. काँग्रेस सरदार पटेलांना विसरली, हे वाक्य मोदींवरच उलटताना दिसत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी सरदार पटेलांच्या जयंतीनिमीत्त केंद्र सरकारने दिलेल्या जाहिरातींची आकडेवारीच प्रसिद्ध केली आहे. तर, भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 2001-2002 या दोन वर्षांमध्ये त्यांची एकही जाहिरात दिली नसल्याचे उघड झाले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये पटेलांच्या जयंतीनिमीत्त दिलेल्या जाहिरातींसाठी 8.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 2009-10 मध्ये युपीएने पटेलांच्या जयंतीनिमीत्त दिलेल्या जाहिरातींसाठी 30 लाख रुपये खर्च झाले. 2010-11मध्ये 4.10 कोटी रुपये खर्च झाले. 2011-12 मध्ये 2.7 कोटी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या आणि 2012-13 मध्ये 1.4 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ते म्हणाले, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार खोटे बोलत आहेत. ते वास्तव सांगण्याचे टाळत निव्वळ खोटे आरोप करत सुटले आहेत. युपीए सरकारने फक्त 2008 मध्ये जाहिरात दिली नव्हती त्याचे कारण कदाचित त्या वर्षी असलेली आर्थिक मंदी असण्याची शक्यता आहे.